स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.

दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अमेरिकेत हिंदुत्‍वाचा डंका !

जागतिक पातळीवर हिंदूंना मिळत असलेले समर्थन आणि त्‍यांचे संघटन ही हिंदुत्‍वाच्‍या उज्‍ज्‍वल भविष्‍याची निश्‍चिती !

अमेरिकेचा पुढील राष्ट्रपती निवडण्याची शक्ती येथील हिंदूंकडे ! – खासदार रिचर्ड मॅककॉर्मिक

अमेरिकेच्या संसदेत वेदिक मंत्रोच्चारात पार पडली पहिली हिंदु-अमेरिकी परिषद

समान नागरी कायदा दृष्टीक्षेपात : विधी आयोगाने जनतेकडून मते मागवली !

देशात समान नागरी कायदा लागू करण्याची हिंदूंची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी दृष्टीक्षेपात ! मान्यताप्राप्त धार्मिक संघटनांना ३० दिवसांत मते पाठवण्याचे आवाहन !!!

अकोला येथे हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्याला गती देण्‍यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्‍थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे.

वस्त्रसंहितेद्वारे धार्मिक पालट !

महाराष्ट्रातील काही मंदिरांनी लागू केलेली वस्त्रसंहिता देशभरातील अन्य मंदिरांनीही लागू केल्यास धार्मिक उत्थानाच्या चळवळीला वेग येईल !

धुळे येथे १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘जनआक्रोश मोर्चा’ !

श्रीरामाच्या मूर्तीच्या विटंबनेच्या विरोधात हिंदूंची संघटित प्रतिक्रिया !

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !

जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

जळगावमधील यावल येथील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर, पारोळा येथील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिर यांच्यासह तीसहून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला.