पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल समितीकडून शासनाकडे सुपुर्द

हा अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. ५ सदस्यीय तज्ञ समितीची नियुक्ती काही मासांपूर्वी केली होती. सरकारने अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचे प्रावधानही केले आहे.

अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

अमरावतीमधील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज

नव्या संसद भवनातील ‘अखंड भारत’च्या मानचित्राचे भारतियांकडून स्वागत !

अखंड भारताच्या मानचित्रात प्राचीन भारतातील महत्त्वाची राज्ये आणि शहरे चिन्हांकित करण्यात आली आहेत. यासमवेतच सध्याच्या पाकिस्तानातील तत्कालीन तक्षशिलेमध्ये प्राचीन भारताचा प्रभाव दर्शवण्यात आला आहे.

नाशिक येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही वस्त्रसंहिता लागू होणार !

सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरातही पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे लोकार्पण !

नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत.

गोवा : सांकवाळ येथे सापडलेल्या देवीच्या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात हिंदूंकडून विचारविनिमय

खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला.

गोवा आणि उत्तराखंड राज्यांत पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार !

मठ-मंदिरांमुळे गोव्याची ओळख ही ‘दक्षिण काशी’ अशी आहे. आता उत्तर काशी ते दक्षिण काशी गोवा अंतर अडीच घंट्यांत कापले जाईल. दोन्ही राज्य सरकारांच्या करारानुसार पर्यटनवृद्धीला चालना मिळणार आहे.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथा वाचनाला अनुमती नाकारण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली !

काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. पुन्हा त्याच पद्धतीची याचिका प्रविष्ट करण्यात आली.

प्रत्येक सनातनी व्यक्तीला हिंदु राष्ट्र हवे आहे ! – प्रसिद्ध कथाकार जया किशोरी

धर्मात राजकारण करता कामा नये. श्रीकृष्णासारखे असे राजकारण केले, तर ते वाईट नाही. दुर्योधनानेही राजकारण केले होते; परंतु ते योग्य नव्हते. त्यामुळे कुणासारखे राजकारण करायचे आहे ?, हे तुम्हाला ठरवायचे आहे.