स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे स्मारकास राज्यशासनाचा १ कोटी ५७ लाख रुपयांचा हिस्सा वितरित करावा !

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास राज्यशासनाचा १ कोटी ५७ लाख रुपयांचा हिस्सा वितरित करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २४ मार्च या दिवशी प्रधान सचिव आणि नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना दिले.

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकातील एका जाहीर सभेत गांधी यांनी ‘सर्व चोरांची नावे ‘मोदी’ कशी काय ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

दुर्दैव म्हणजे काही आमदारदेखील गोव्यात सुरक्षित पर्यटन देण्याचा विचार न करता त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी दलालांना आश्रय देत आहेत. असे करून हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी गोव्याच्या पर्यटन उद्योगाला उद्ध्वस्त  करत आहेत.

राज्यपालांच्या नियमांनुसार प्रशासकीय अधिकार अध्यक्षांकडेच ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

राज्यपालांनी वर्ष १९७२ मध्ये राज्य विधीमंडळ प्रशासकीय अधिकाराविषयी अध्यक्ष आणि सभापती यांची समिती सिद्ध केली आहे. विधानसभेचे अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती यांपैकी कुणी एक कामकाज पहाण्यास उपलब्ध नसेल किंवा असमर्थ असेल, तरी उर्वरित पिठासीन अधिकार्‍याला हे कामकाज पहाण्याचे अधिकार आहेत..

जापानमध्ये संसदेत अनुपस्थित रहाणार्‍याची खासदारकी रहित !

भारतात संसदेत गदारोळ करणार्‍यांची खासदारकी रहित होत नाही, तेथे अनुपस्थित रहाणार्‍याची कधीतरी होईल का ?

चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

तमिळनाडूत भाजपच्या १३ नेत्यांचा अण्णाद्रमुक पक्षात प्रवेश !

याविरोधात भाजपच्या नेत्यांनी आंदोलन करत अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी यांच्यावर युतीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

स्त्रियांनी राजकारणात यावे, त्यांना संधी देण्यास मनसे उत्सुक ! – राज ठाकरे

सर्व चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड चालू आहे, ती थक्क करणारी आहे. सर्वच ठिकाणच्या स्त्रिया जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत होता.

कोलगाव (सिंधुदुर्ग) येथे नवीन इमारत बांधूनही शाळा भरते जुन्याच धोकादायक इमारतीत !

जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची नवी इमारत बांधून १ वर्ष पूर्ण झाले आहे. आता श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने शाळेच्या नवीन इमारतीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.  

निकालांचा मतीतार्थ !

हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्‍याच्‍या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही होणार्‍या राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, कर्नाटक राज्‍यांच्‍या निवडणुकांत भाजपने हिंदुत्‍व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्‍ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्‍यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्‍यास वेळ लागणार नाही !