निकालांचा मतीतार्थ !

हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्‍याच्‍या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही होणार्‍या राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, कर्नाटक राज्‍यांच्‍या निवडणुकांत भाजपने हिंदुत्‍व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्‍ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्‍यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्‍यास वेळ लागणार नाही !

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या स्‍फूर्तीगीताने महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळ अधिवेशनाला प्रारंभ !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताला राज्‍यगीताचा दर्जा मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत प्रथमच हे गीत वाजवण्‍यात आले. ‘वन्‍दे मातरम्’ आणि त्‍यानंतर ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताने विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.

दुसर्‍या दिवशीचे विधीमंडळाचे कामकाज विलंबाने मिळत असल्‍याची विरोधी पक्षनेत्‍यांची तक्रार !

अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्‍यानंतर त्‍याची माहिती घेण्‍यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्‍यास त्‍यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्‍या सूत्राखाली…

विरोधी पक्षाच्‍या आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा. मुख्‍यमंत्र्यांनी ज्‍या प्रकारची विधाने केली, त्‍यातून हे राज्‍य सरकार खरोखरच ‘महाराष्‍ट्रविरोधी’ वाटू लागले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्‍हटले.

रत्नागिरी : वाटद सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत

सरपंचपदाच्या कालावधीत अंजली विभुते यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका येथील स्थानिक व्यापार्‍यांना बसला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सर्वपक्षीय सदस्य विभुते यांच्या विरोधात एकवटले होते.

नेपाळमध्ये उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचे त्यागपत्र

नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे.

देहली महानगरपालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये हाणामारी !

संसद आणि राज्यांच्या विधानसभांबरोबर अशा घटनांचे लोण महानगरपालिकांत पोचले असून उद्या हे ग्रामपंचायतींमध्येही पोचण्याची शक्यता आहे. यातून देशातील लोकशाहीची चिंताजनक स्थिति स्पष्ट होते !