जापानमध्ये संसदेत अनुपस्थित रहाणार्‍याची खासदारकी रहित !

जपानचे खासदार योकिजू हिगाशितानी (डावीकडे)

टोकीयो (जपान) – सतत अनुपस्थित राहिल्याने जपानचे खासदार योकिजू हिगाशितानी यांची खासदारकी रहित करण्यात आली आहे. जपानच्या संसदेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली आहे. यापूर्वी अन्य एका खासदाराची वाईट वर्तणुकीमुळे खासदारकी रहित करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

भारतात संसदेत गदारोळ करणार्‍यांची खासदारकी रहित होत नाही, तेथे अनुपस्थित रहाणार्‍याची कधीतरी होईल का ?