निवडणुकीसाठी राष्ट्रपुरुषांचा उपयोग करू नये ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

कर्नाटकमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांची मते मिळावीत, यासाठी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

गोवा : लुईझिन फालेरो यांचे राज्यसभा खासदारपदाचे त्यागपत्र

मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून दर्जा रहित !

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून असलेला दर्जा रहित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करत नसल्याने हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

रोशनी शिंदे यांची प्रकृती स्थिर ! – डॉ. उमेश आलेगावकर

रोशनी शिंदे यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार लागला आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसेच त्या गर्भवतीही नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

रशिया भारतासमवेतचे संबंध अधिक दृढ करणार !

या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.

आसाम विधानसभेत गदारोळ : ३ आमदार निलंबित

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्‍वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले.

म्हादईप्रश्नी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

विधानसभेच्या दुसर्‍या दिवशी प्रश्नोत्तर तासाला प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांनी ‘म्हादईचे पाणी गोवा सरकारच्या संमतीने कर्नाटकला दिल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विधान हे बरोबर आहे कि चुकीचे ते सांगा ?’, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले.

इम्रान खान यांची हत्या होईल किंवा आमची !

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका मुलाखतीत, ‘इम्रान खान यांनी देशाच्या राजकारणाला अशा वळणावर नेऊन ठेवले आहे, जिथे एकतर त्यांची हत्या होईल किंवा आमची’, असे स्फोटक वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानमध्ये सैन्य सत्ता हस्तगत करण्याची शक्यता !

पाकिस्तान सरकार अर्थसंकल्पामध्ये सैन्यावर करण्यात येणार्‍या खर्चात कपात करणार आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य अप्रसन्न आहे. 

संजय राऊत यांच्याविषयी राज्यसभेचे अध्यक्ष घेणार निर्णय !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या प्रस्तावित कारवाईने वेग धरला आहे. राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव २५ मार्च या दिवशी विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी राऊत सदस्य असलेल्या राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.