पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची ‘एस्.आय.टी.’कडून चौकशी करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना अर्पण केलेल्या ३०० हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आले आहे.

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठलाच्या प्रसादाचे लाडू निकृष्ट !

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा लाडवाचा प्रसाद हा निकृष्ट असल्याचा अहवाल लेखापरीक्षणात नोंदवण्यात आला आहे.

श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाची पूजा पूर्वापार करत आलेल्या बडव्यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरावर सरकारचा अधिकार आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी श्री विठ्ठलाची पूजा मागील शेकडो वर्षांपासून जशी चालू आहे, तशीच याहीपुढे व्हावी, याविषयी कोणाचेही दुमत नसावे.

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर सरकारमुक्‍त होण्‍याविषयी मुंबई न्‍यायालयाने राज्‍य सरकारचे म्‍हणणे मागवले !

सर्वत्रची मंदिरे सरकारच्‍या कह्यातून मुक्‍त होण्‍यासाठी हिंदूंनी संघटितपणे वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्‍यक !

पंढरपूर येथील कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या तुळशी वृंदावनातील संतांच्या मंदिरांचे चौथरे निकृष्ट दर्जाचे !

तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा आणि संत एकनाथ महाराज यांचे मंदिर कोसळल्याच्या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

श्री विठ्ठलभक्‍ती बडव्‍यांकडून शिका अन् श्री विठ्ठलाची अपकीर्ती थांबवा ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षक कृती समिती, पंढरपूर

अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्‍यक्‍तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी ३० जूनला पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

अधिवेशन परमपूज्य श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणीस प्रारंभ !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कह्यात घेण्याच्या संतापाविषयी महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना बडतर्फ करा, असे कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाला सांगावे.

पंढरपूर मंदिरातील १ टन द्राक्षे गायब झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी