श्री विठ्ठलभक्‍ती बडव्‍यांकडून शिका अन् श्री विठ्ठलाची अपकीर्ती थांबवा ! – गणेश लंके, अध्‍यक्ष, श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर संरक्षक कृती समिती, पंढरपूर

पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षक कृती समिती’चे अध्यक्ष श्री. गणेश लंके

पंढरपूर – ३०-४० वर्षांच्‍या राजकीय कारकीर्दीत ३-४ वेळा स्‍वत:ची निष्‍ठा, स्‍वत:चे दैवत पालटणारे राजकीय लोक कुठे, तर सहस्रो वर्षांपूर्वीपासून म्‍हणजे विठ्ठलभक्‍तीचा मानबिंदू असणार्‍या वारकरी संप्रदायाच्‍या जन्‍मापूर्वीपासून ते आजच्‍या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठलभक्‍ती भोवतीच स्‍वत:चे जीवन व्‍यतीत करणारे बडवे कुठे ? अफझलखान, तसेच परकीय आक्रमणे यांपासून विठ्ठलमूर्तीचे संरक्षण, पावित्र्य जतन करून ठेवणारे बडवेच होते. विठ्ठलाची तुलना राजकीय व्‍यक्‍तीशी करणे, हे संतापजनक आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने निषेध करायला हवा होता.