हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजितसिंह घाटगे यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास कागल पोलिसांचा नकार !

हसन मुश्रीफ यांनी विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामचंद्रांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप ! हिंदूंवर गुन्हा नोंद करण्यास तत्परता दाखवणारे पोलीस हिंदूंच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

विवेक अग्निहोत्री आता देहली दंगलीवर ‘द देहली फाइल्स’ चित्रपट बनवणार !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली आहे. ‘द देहली फाइल्स’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१० वीपर्यंत ‘हिंदी’ विषय अनिवार्य करण्यास ईशान्येकडील राज्यांचा विरोध !

संस्कृत ही सर्वच भाषांची जननी असून ती समृद्ध भाषा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता भारतात संस्कृत अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच भाषाप्रेमींना वाटते !

जे.एन्.यू.मध्ये श्रीरामनवमीची पूजेवरून अभाविप आणि साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी !

जे.एन्.यू.’मध्ये राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीचे विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या अधिक ! काँग्रेसच्या राज्यात यांना प्रोत्साहन मिळत होते. आता भाजपच्या राज्यात त्यांना प्रखर विरोध होत आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांत संघर्षाच्या घटना घडत आहेत !

ऊना (हिमाचल प्रदेश) येथे धर्मांधाकडून १५ वर्षीय मुलीची हत्या

अशा वासनांध धर्मांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !

मध्य प्रदेश कांग्रेस के श्रीराम नवमी और हनुमान जयंती मनाने के आदेश का पार्टी विधायक आरिफ मसूद ने किया विरोध !

मसूद ने कभी इफ्तार का विरोध किया था ?

काँग्रेसच्या धर्मांध आमदाराचा हिंदुद्वेष जाणा ! 

मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा लेखी आदेश दिला. यावर काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी आक्षेप घेत ‘अशा आदेशामुळे चुकीचा प्रघात पडेल’, असे म्हटले आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा आदेश

काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे !

राष्ट्रपतीपद सोडण्यास गोटबया राजपक्षे यांचा नकार !

श्रीलंकेमध्ये सध्या आर्थिक संकटामुळे अराजकसदृश्य स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती गोटबया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र देण्याची विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. तसेच ‘संसदेत बहुमत सिद्ध करणार्‍या पक्षाला सत्ता सोपवण्यास आम्ही सिद्ध आहोत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

पशूहत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करा ! – कर्नाटक सरकारचा आदेश

सर्वच राज्यांनी, विशेषतः भाजपशासित राज्यांनी असा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !