ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांचे त्यागपत्र

भारतासमवेच्या मुक्त व्यापारी कराराला विरोध केल्याचा परिणाम !

लंडन (ब्रिटन) – भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांनी भारतासमवेच्या मुक्त व्यापारी कराराला विरोध केल्यामुळे त्यांना त्यागपत्र द्यावे लागल्याचेही म्हटले जात आहे. मुक्त व्यापार कराराच्या साहाय्याने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वर्ष २०३० पर्यंत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.

सुएला ब्रेव्हरमन म्हणाल्या होत्या की, भारतासमवेतच्या मुक्त व्यापार करारामुळे ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढेल. अनेक भारतीय प्रवासी व्हिसाची मुदत संपल्यानंतरही ब्रिटनमध्येच रहातात.

संपादकीय भूमिका

सध्या जगभरात सत्ताधारी पक्षात किंवा एखाद्या आस्थापनात भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाल्यास भारतियांना त्याचा अभिमान वाटतो; मात्र भारतीय वंशाच्या या लोकांना भारताविषयी अभिमान असेलच, असे नाही. सुएला ब्रेव्हरमन यांच्या विरोधावरून हे लक्षात घेते. भारतीय वंशाची ही मंडळी, जेथे वास्तव्य करतात, त्या देशाचे किंवा संबंधित आस्थापनाचे हित साधतात. त्यांना भारताच्या हिताशी काही देणेघेणे नसते, हे लक्षात घ्या !