अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

आमदार रवी राणा

अमरावती – बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी, तसेच त्यापूर्वी आणि नंतरही विविध ठिकाणी आपल्याविषयी खोटी, अपर्कीतीकारक, बनावट आणि चारित्र्यहनन करणारी जाहीर वक्तव्ये केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या विरोधात येथील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार राणा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ५०१ अन्वये अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.