पणजी, १५ ऑक्टोबर (प्र.प.) – देशद्रोही आणि चिथावणीखोर मुसलमानांवर कारवाई न झाल्यास हिंदू रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली आहे. इंदिरानगर, चिंबल येथील मशिदीच्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवणार्या हिंदूंच्या घरासमोर ‘सर तन जे जुदा’ (शिर शरिरापासून वेगळे करणे) अशा घोषणा देणे आणि सांखळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा फडकावून हिंदू-मुसलमान अशी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करणे या घटनांच्या प्रार्श्वभूमीवर प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी ही चेतावणी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘सांखळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा फडकावण्याचा प्रकार हा बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (‘पी.एफ्.आय.’च्या) कार्यकर्त्यांनी केला आहे, यामध्ये शंका नाही. बायणा, वास्को येथे ‘पी.एफ्.आय.’च्या म्होरक्याच्या घरावर छापा टाकण्याच्या घटनेनंतर गोव्यात २ ठिकाणी हिंदू-मुसलमान यांच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांना अनुसरून पोलिसांनी अजूनही कसलीच कारवाई केलेली नाही. इंदिरानगर येथे मशिदीच्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात तक्रार करणारा तक्रारदार संतोष राजपूत यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. चितावणीखोर धर्मांध मुसलमानांच्या विरोधात त्वरित कारवाई न झाल्यास गोव्यातील हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागेल. हा हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. गोव्यातील हिंदूंना धर्मांध मुसलमानांकडून दिल्या जाणार्या धमक्या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ कदापी सहन करणार नाही.’’
हिंदूंनी पुकारलेल्या ‘भटकळ बंद’ला उत्तम प्रतिसाद: मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
कोणत्याही कारणास्तव मला माझा (हिंदु) धर्म सोडता येणार नाही ! – D. K. Shivakumar
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त