हिंदुद्वेषी वीर दास याच्या मुंबईतील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांचा विरोध !

वेळोवेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारा हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास याच्या मुंबईमधील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

समान नागरी कायदा हवाच !

मुसलमानांचा विरोध केवळ त्यांच्या सोयीसुविधा बंद होतील, यासाठीच आहे. वास्तविक या निधर्मी देशात धर्माच्या आधारे सोयीसुविधा उपभोगणे, हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान असून गेली ७५ वर्षे तो केला जात आहे. आता तो थांबवणेच देशहिताचे आहे.

एन्.डी.टी.व्ही.चे पत्रकार नसीम अहमद मंदिरातील कार्यक्रमात सहभागी झाल्याने धर्मांधांचा विरोध

हिंदूंच्या मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले धर्मांध मुसलमानांना चालते; मात्र एखाद्या मुसलमानाने हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला, तर त्यांना चालत नाही ! या दुटप्पीपणाविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते तोंड उघडतील का ?

अफझलखानाचा कोथळा पुन्हा काढला !

शासनाच्या या कौतुकास्पद कृतीसाठी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांना दीर्घकाळ वाट पहावी लागली. असे असले, तरी त्यांना शासनाने चांगली बातमी दिलीच ! हिंदुत्वनिष्ठ शासनाचेही अभिनंदन ! आता हिंदुत्वनिष्ठांची गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त होण्यासाठीची प्रतीक्षा शासनाने संपवावी, ही जनतेची अपेक्षा !

चीनची उघड दादागिरी !

चीनच्या या वाढत्या दादागिरीला मोदी सरकारने आता ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे. चीनला धडा शिकवण्याचा नामी उपाय म्हणजे चीनशी सर्व व्यापारी संबंध तोडून टाकणे ! नाक दाबल्यावरच तोंड उघडत असेल, तर त्याला आपण तरी काय करणार ?

आर्थिक आरक्षणाचा शिक्का !

आर्थिक आरक्षण वैध ठरवतांना न्यायमूर्तीनी ‘कोणतेही आरक्षण अमर्यादित काळासाठी असू नये. त्याचा आढावा घेतला जावा, जे पुढारलेले आहेत, त्यांना वगळण्यात यावे, स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याने आरक्षणाचा पुन्हा नव्याने विचार केला पाहिजे’, अशा सूचना केल्यात. याचा विचार शासनकर्त्यांकडून केला जाईल, अशी अपेक्षा करूया !

गोवा : डाव्या विचारसरणीच्या वक्त्यांचा भरणा असलेला डी.डी. कोसंबी विचार महोत्सव विरोधामुळे स्थगित

सरकारच्या या निर्णयाविषयी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो म्हणाले, ‘‘हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.’’ महोत्सव स्थगित ठेवल्याने ‘दक्षिणायन अभियान’ या डाव्या विचारसरणीच्या प्रागतिक विचारवंतांनी सरकारवर टीका केली आहे.

दादर येथे हलालविरोधी बैठकीचे आयोजन !

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हलाल अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करा ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्‍या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा.

संभाजीनगर येथील ‘हज हाऊस’च्या मिनारमध्ये शौचालय बांधल्याने मुसलमान संतप्त !

संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास अधिकार्‍यांच्या दालनात शौचालय बांधणार !