विश्वास !
आमच्या लहानपणी एक म्हण सातत्याने ऐकायला मिळायची, ‘विश्वास बुडाला पानिपतच्या लढाईत !’ त्या वेळी त्याचा अर्थ उमजत नसे; आता जसे मोठे होत गेलो, तसतसे लक्षात येऊ लागले की, ‘विश्वास’ ही संज्ञा समाजमनासाठी फार महत्त्वाचे अंग आहे. व्यवहार असो किंवा अध्यात्म सर्व जग विश्वासावर चालते.