Hindus Warning On Mehandi Jihad : मुसलमान तरुणांनी करवा चौथच्या दिवशी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – यंदाच्या वर्षी करवा चौथ हा सण २० ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त ‘मेहंदी जिहाद’ला (हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढण्याच्या नावाखाली त्यांना फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याला) आळा घालण्यासाठी हिंदु संघटनांनी सिद्धता चालू केली आहे. करवा चौथच्या दिवशी हिंदु महिला हातांवर मेहंदी काढतात. या दिवशी मुसलमान तरुणांनी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे. ‘बाजारपेठांमध्ये कुठेही मुसलमान तरुण हिंदु महिलांना मेहंदी काढतांना दिसले, तर त्यांना काठ्यांनी चोप देण्यात येईल. त्या वेळी काठ्यांचा वापर करता यावा, यासाठी काठ्यांचे पूजन करून त्या सिद्ध ठेवल्या आहेत’, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे.

करवा चौथ म्हणजे काय ? 

करवा चौथ प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा केला जातो. या दिवशी हिंदु महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर निर्जल राहून, म्हणजे पाणीही न पिता उपवास करतात. संध्याकाळी चंद्र पाहूनच उपवास सोडतात. या दिवशी विवाहित महिला नवविवाहितेप्रमाणे शृंगार करतात. त्या दिवशी हातांवर मेहंदीही काढली जाते.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची बैठक

करवा चौथच्या पार्श्‍वभूमीवर मेहंदी जिहादला आळा घालण्यासाठी मुझफ्फरनगर येथे ‘संयुक्त हिंदु मोर्चा’च्या वतीने शहरात हिंदु संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. विश्‍व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍यांनीही बैठक घेऊन हिंदु भगिनींना मुसलमानांकडून मेहंदी काढून न घेण्याचे आवाहन केले.

व्यापार्‍यांनाही विनंती करणार

हिंदु संघटनांनी बैठकीत सांगितले की, ज्या व्यापार्‍यांकडून महिलांच्या हातावर मेहंदी काढण्याचा व्यवसाय केला जातो, अशा व्यापार्‍यांच्या भेटी घेण्यात येणार आहेत. त्यांना ‘मुसलमान तरुणांनी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू देऊ नये’, अशी विनंती करण्यात येणार आहे. जे व्यापारी ही विनंती मान्य करणार नाहीत, त्यांना धडा शिकवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या काठ्या सिद्ध असतील.

संपादकीय भूमिका

हिंदूंचे परिणामकारक संघटन, हाच भारतातील सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यावरील उपाय आहे !