Jaipur RSS Swayamsevak Attacked : येथे मंदिरात शरद पौर्णिमा साजरी करणार्‍या संघ स्‍वयंसेवकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण !

  • १० स्‍वयंसेवक गंभीररित्‍या घायाळ

  • धर्मांधांनी प्रसादाच्‍या मडक्‍याला मारली लाथ

घायाळ स्‍वयंसेवक

जयपूर (राजस्‍थान) – येथील करणी विहार पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील रजनी विहार शिवमंदिरात १७ ऑक्‍टोबरच्‍या रात्री रा.स्‍व. संघाच्‍या जगदंबानगर शाखेकडून शरद पौर्णिमा उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. तेथे लोकांना खीर वाटण्‍यात येत होती. या वेळी प्रथम हनुमान चालिसाचे पठण आणि नंतर रामधुनीचे पठण करण्‍यात आले. त्‍यानंतर मंदिराच्‍या शेजारी रहाणारा नसीब चौधरी त्‍याच्‍या मुलांसह मंदिरात पोचला आणि ते सर्वजण कार्यक्रम थांबवण्‍याची धमकी देऊ लागले. रागाच्‍या भरात नसीब चौधरी आणि त्‍याची मुले यांनी खीर ठेवलेल्‍या मडक्‍याला लाथ मारली आणि नंतर संघ स्‍वयंसेवकांवर चाकूने आक्रमण केले. यात १० जण घायाळ झाले. त्‍यांना तातडीने एस्.एम्.एस्. रुग्‍णालयात उपचारार्थ भरती करण्‍यात आले. या स्‍वयंसेवकांच्‍या पोटावर आणि छातीवर अनेक वार करण्‍यात आल्‍याने त्‍यांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्‍काळ कारवाई करत आरोपी नसीब चौधरी आणि त्‍याचा १ मुलगा यांना अटक केली. या संपूर्ण घटनेनंतर घटनास्‍थळी मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता. राज्‍याचे मंत्री राज्‍यवर्धन सिंह राठौर, आमदार गोपाल शर्मा, भाजपचे नेते अरुण चतुर्वेदी आणि संघाचे अनेक पदाधिकारी घायाळांना भेटण्‍यासाठी रुग्‍णालयात पोचले.

आमदार गोपाल शर्मा यांनी सांगितले की, मंदिराच्‍या शेजारी रहाणार्‍या नसीब चौधरी याला शिवमंदिराची जागा कह्यात घ्‍यायची आहे. त्‍यामुळे त्‍याने हे कृत्‍य केले आणि निशस्‍त्र लोकांवर चाकूने आक्रमण केले. यात शंकर बगरा, मुरारीलाल, राम पारीक, लखन सिंह जदौन, पुष्‍पेंद्र आणि दिनेश शर्मा आदी गंभीररित्‍या घायाळ झाले आहेत.

गोपाल शर्मा यांनी पोलिसांनी मंदिराच्‍या गर्भगृहात बूट घालून प्रवेश केल्‍याचा आणि संघाच्‍या स्‍वयंसेवकांवर लाठीमार केल्‍याचा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेश किंवा पाकिस्‍तान नाही, तर भारतात भाजप सरकारच्‍या राज्‍यांत धर्मांध मुसलमान हिंदूंवर, मंदिरांवर, धार्मिक मिरवणुकांवर सातत्‍याने आक्रमण करत आहेत, ही हिंदूंसाठी भयंकर चिंताजनक स्‍थिती आहे. जे इस्‍लामी देशांत होत आहे, तेच पुढील काही वर्षांत भारतात होऊन हिंदूंना देशातून पळून जाण्‍याचीही संधी मिळणार नाही, हे लक्षात घ्‍या !
  • अधर्मियांवर वचक बसवण्‍यासाठी प्रभावी हिंदूसंघटन करण्‍याला पर्याय नाही, हे हिंदू केव्‍हा जाणणार ? याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर हिंदू नामशेष व्‍हायला वेळ लागणार नाही !