विश्वास !

विश्वास तुटू लागला आहे

आमच्या लहानपणी एक म्हण सातत्याने ऐकायला मिळायची, ‘विश्वास बुडाला पानिपतच्या लढाईत !’ त्या वेळी त्याचा अर्थ उमजत नसे; आता जसे मोठे होत गेलो, तसतसे लक्षात येऊ लागले की, ‘विश्वास’ ही संज्ञा समाजमनासाठी फार महत्त्वाचे अंग आहे. व्यवहार असो किंवा अध्यात्म सर्व जग विश्वासावर चालते. प्राचीन काळापासून भारतात सर्व व्यवहार विश्वासावर चालत असे. पूर्वीच्या काळी वस्तूंची देवाणघेवाण पद्धत होती. प्रत्येकाने आपल्या जवळील उपयुक्त वस्तू दुसर्‍याला द्यायची त्या बदल्यात धान्य किंवा अन्य उपयुक्त वस्तू घ्यायची. ‘पै पै चा हिशोब’ अल्प होता. काळ पालटत गेला आणि विश्वासाला तडा जाऊ लागला. माणसाने माणसावर टाकलेला विश्वास तुटू लागला. घराघरांत भेद होऊ लागला आणि कडी-कोयंड्याची पद्धत पडली.

हिंदुस्थानात मुसलमानी पातशाह्या चालून आल्या आणि काश्मीरपासून खाली दक्षिणेपर्यंत अनेक लढवय्या शूर राजांनी शेकडो वर्षे त्यांचा निकराने प्रतिकार केला, कडवी झुंज देऊन प्राणांचे बलीदान दिले; परंतु तरीही १४०० वर्षे हे यवन इथे वर्चस्व गाजवत होते, याला कारणीभूत होते काही विश्वासघातकी हिंदु, ज्यांनी त्यांच्या राजांशी अप्रामाणिकपणा केला, समस्त हिंदूंचा विश्वासघात केला ! यामुळे अनेक पराक्रमी हिंदु राजे मुसलमानांकडून मारले गेले आणि त्यांच्या प्रदेशावर राज्य करून प्रजेचा छळ केला.

आता तर कलियुगातील आपत्काळ चालू झाला आहे. कुणाचाच कुणावर विश्वास राहिला नाही; म्हणून शास्त्रज्ञांनी माणसांच्या कृतींना समोर आणण्यासाठी विविध प्रयोग केले. छायाचित्रक आले. या सगळ्यांतूनच सीसीटीव्हीचाही जन्म झाला. आता पती-पत्नी, पालक आणि पाल्य यांचा एकमेकांवर विश्वास नसल्याने घरातही ‘सीसीटीव्ही’ लावले जातात, इतकेच काय त्यांच्यामागे गुप्तहेरही ठेवले जातात. ही स्थिती का उद्भवली आहे ? धर्म, अध्यात्म यांवरील विश्वास न्यून झाल्याने माणसे स्वार्थी झाली. ‘सर्वत्र भगवंत आहे’, या विश्वासावर भारतीय संस्कृती आणि सृष्टी लक्षावधी वर्षे चालत होती. विज्ञानाच्या चुकीच्या अतिरेकामुळे आता प्रत्येकाला  ‘पुरावा’ हवा आहे. ‘देव कुठे आहे दाखवा ?’, असे आता म्हटले जाते. ‘देव ही अनुभवायची गोष्ट आहे’, यावरचा विश्वास न्यून झाला आहे. स्वतः देव जरी येऊन म्हणाला, ‘मी देव आहे’, तरी कुणी त्यावर किती विश्वास ठेवेल कि नाही ? हे सांगणे फार कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी जे देवाला अनुभवतात, अशा आध्यात्मिक उन्नत व्यक्तींवर विश्वास ठेवायला हवा. समाजमनावरील धर्माचे संस्कार नष्ट झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. माणसामाणसांतील विश्वास वृद्धींगत होण्यासाठी माणसाचा देवावरील विश्वास वाढायला हवा. धर्माचरणी माणसे वाढली की, धर्मराज्य येईल आणि तेव्हा प्रजा पूर्वीसारखी सुखी होऊन एकमेकांच्या विश्वासाला पात्र होईल !

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.