मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव !

नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यासह पाच सदस्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.

मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या धर्मांधाला काश्मीरमधून अटक !

अमली पदार्थांनी भारताची भावी पिढी उद्ध्वस्त करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या व्यसनाने लक्षावधी युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अशांना कठोरात कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ‘पालक सचिव’ नुसते कागदावरच !

प्रशासनातील कामचुकारपणा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत !

मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.

सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्‍या महेश मांजरेकर यांनी मराठीजनांची क्षमा मागावी !

महिला आणि बाल लैंगिक दृश्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी, समाजमनावर विपरीत परिणाम करणार्‍या अश्लाघ्य चित्रपटांना अनुमती मिळणे निषेधार्ह !

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट !

येथील कोरोनाची रुग्णसंख्या आता घटतांना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य आधुनिक वैद्य अजित देसाई यांनी माहिती दिली आहे.

छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हिंसक, अश्लील दृश्यांचा भडीमार करून अल्पवयीन मराठी मुलांना निदर्यी  हत्यारे आणि वासनांध दाखवण्याचा प्रयत्न !

मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोणच्या, कोण नाय कौच्या’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित ! सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे ‘ऑनलाईन’ तक्रार !

लोकनेते ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ची राज ठाकरेंकडून घोषणा

प्रकल्पग्रस्त आणि आगरी-कोळी समाजाचे दिवंगत ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांच्या सन्मानार्थ ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ अर्थात् पाठ्यवृत्ती चालू होत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

वस्तू आणि सेवा कर विभागाची फसवणूक करणार्‍या दोन व्यावसायिकांना अटक !

विशेष कर चुकवेगिरी विरोधातील मोहिमेमध्ये ४ मासांत ५०० हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये ४० जणांना अटक करण्यात आली आहे.