पुणे – येथील वाघोली परिसरातील एका गोदामातून चोरट्यांनी २८० भ्रमणसंगणक चोरल्याची घटना घडली. संबंधित चोरांनी हे भ्रमणसंगणक मिळेल त्या किमतीत छत्रपती संभाजीनगर येथे विकण्याचा प्रयत्न केला.
या गोदामात उत्तरप्रदेश येथील सुरेश महादेव कुमार हा कामगार कामाला होता. दिवाळीत अधिक पैसे घरी नेण्यासाठी तो आणि त्याचा मित्र यांनी गोदाम फोडून २८० भ्रमणसंगणकांची चोरी केली. चोरी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि तेथून उत्तरप्रदेश येथे चोरटे जात होते. तेव्हा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याकडील पैसे संपल्याने काही भ्रमणसंगणक मिळेल त्या किमतीत त्यांनी विकले. पोलिसांनी आतापर्यंत यातील ३ आरोपींना अटक केली असून १ आरोपी पसार आहे. भ्रमणसंगणकासह सर्व ऐवजाचे मूल्य १ कोटी १ लाख रुपये आहे.