गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण !

लता मंगेशकर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे; मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून ऑक्सिजनची आवश्यकता भासणार नाही.

योग्य निर्णय आल्यास एस्.टी. महामंडळाचे विलीनीकरण करू ! – अनिल परब, परिवहनमंत्री

कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये कर्मचार्‍यांना पदनिहाय वेतनश्रेणीसह ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याविषयी एस्.टी. चालू झाल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

जातीय तेढ निर्माण करणार्‍या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी !- अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

दलित, बहुजन आणि ब्राह्मण यांच्यात दंगल निर्माण व्हावी, यासाठी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या विरुद्ध काल्पनिक कथांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढल्यास दळणवळण बंदीविना पर्याय नाही !

राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक मिळण्यासाठी न्यायालयात याचिका

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ३ वरिष्ठ अधिकार्‍यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे; मात्र अद्यापही कायमस्वरूपी पोलीस महासंचालक नेमण्यात आले नसून संजय पांडे महासंचालक पदावर कायम आहेत. 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात पुन्हा निर्बंध, रात्र संचारबंदीसह समारंभांवर बंधने !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ८ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

मुंबईतील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कार्यालयात ६८ कर्मचारी कोरोनाबाधित !

७ जानेवारी या एकाच दिवशी मुंबईतील ९३ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. सध्या कोरोनाबाधित ४०९ पोलिसांवर उपचार चालू आहेत. गेल्या ४८ घंट्यात २ कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई येथे महापालिकेच्या कोविड केंद्रात ८० टक्के खाटा रिक्त, तर खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी !

खासगी रुग्णालयांनी स्वतःचे ८० टक्के बेड हे कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावेत आणि कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा कडक सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत

खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करू नये ! – मुंबई महानगरपालिका

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात खाटांची व्यवस्था होती, तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने सर्व रुग्णालयांना दिले आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत ३०० हून अधिक इमारती सील !

येथे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहरात ४ पटींनी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वृद्धी झाली असून ३०० हून अधिक इमारती प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.