मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव !

मुंबई – मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यासह पाच सदस्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.

या प्रस्तावात म्हटले आहे की, आयकर खात्याच्या अहवालानुसार मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भ्रष्टाचाराद्वारे जमा केलेले काळे धन पांढरे करण्यासाठी पैशांची अफरातफर केल्याचे उघड झाले आहे. स्थायी समितीच्या सभेत कोविड काळातील गैरव्यवहार, शालेय विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीतील भ्रष्टाचार इत्यादी विविध कारणांमुळे अविश्वास व्यक्त करत आहोत, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले आहे.