पुणे येथे बिबट्या आल्याची माहिती ‘एआय’ने कळणार !

पुणे – वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे. वन विभाग नागरिकांना सूचना देत असतो; मात्र तरीही नागरिकांना साहाय्य व्हावे म्हणून बिबट्या आल्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी जुन्नर वन विभागाने ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) प्रणालीद्वारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. विद्या प्रतिष्ठान बारामती आणि सिमुसॉफ्ट टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या साहाय्याने शेतात काम करणार्‍यांसाठी मानेला लावण्याचा विशिष्ट प्रकारचा पट्टा विकसित करण्यात आला आहे. मेंढपाळांसाठी विशिष्ट प्रकारचे तंबू विकसित करण्यात येत आहेत.