मुंबई महापालिकेकडून कंत्राटदाराला ८ कोटी रुपयांचा दंड

मुलुंड येथे कचर्‍याची विल्हेवाट मुदतीत केली जात नसल्याचे प्रकरण

मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड

मुंबई – येथील मुलुंड डम्पिंग ग्राऊंड (कचरा टाकण्यात येणारी जागा) शास्त्रोक्त पद्धतीने बंद केल्यानंतर येथील ७० लाख मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. यासाठी संयुक्त भागीदारीतील ३ कंत्राटदारांना ६ वर्षांत म्हणजेच जून २०२५ पर्यंत कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे काम सोपवण्यात आले; मात्र सध्या केवळ ३२ लाख मेट्रिक टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल. मुदतीत कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात अपयश येत असल्याने मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला ८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला.

संपादकीय भूमिका

दिलेल्या मुदतीत कचर्‍याची विल्हेवाट कंत्राटदारांकडून लावली जात आहे का ? हे पहाण्याचे दायित्व कुणाचे ? ते पार न पाडणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !