पुणे जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापतींची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता शासनाधीन !

अंमलबजावणी संचालनालयाची पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील मालमत्तांवर धाड !

पुणे – जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या ८५ कोटी रुपयांच्या पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांत असलेल्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने शासनाधीन केल्या. बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॉड्रिंग) प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने २१ ऑगस्ट या दिवशी धाड घातली होती. एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) बांदल यांच्या विरोधात कारवाई केली होती. शिवाजीराव भोसले बँक अपव्यवहार प्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती; मात्र त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यांची उमेदवारी रहित केली होती.

संपादकीय भूमिका :

भ्रष्टाचाराची कीड लागलेली व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे !