मुंबई – महाराष्ट्राच्या येत्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सूची घोषित करणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. राज्यातील २८८ जागांपैकी भाजपने ९९ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. या सूचीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मोठे नेते, तसेच अशोक चव्हाण आणि रावसाहेब दानवे या ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांनाही भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने घोषित केलेली उमेदवारांची पहिली सूची –
|
महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे मुख्य पक्ष आहेत. यांतील भाजपने पहिल्या सूचीत ९९ नावे घोषित केली, त्या अर्थी भाजपची पुढची सूचीही साधारण ९० उमेदवारांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपकडून १८० जागा लढवल्या जाण्याची शक्यता असून उर्वरित १०८ जागांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये विभागणी होऊ शकते. गेल्या निवडणुकीत भाजपने १६४ जागा लढवत १०५ जागा जिंकल्या होत्या.
नागपूर (पश्चिम) येथून देवेंद्र फडणवीस, कामठी – चंद्रशेखर बावनकुळे, जळगाव – सुरेश भोळे, जामनेर – गिरीश महाजन, डोंबिवली – रवींद्र चव्हाण, ठाणे – संजय केळकर, ऐरोली – गणेश नाईक, जळगाव शहर – सुरेश भोळे आदी नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक नवीन उमेदवारांनाही भाजपकडून संधी देण्यात आली आहे.