काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासहित अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

गूगल भाषांतराच्या मर्यादेमुळे भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांचा नावाचा आक्षेपार्ह अर्थ !

गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे म्हणाल्या, त्यांनी आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती पोस्ट इतरांना पाठवायला नको होती.

५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी ‘५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात येणार आहेत’, असे वृत्त प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले होते; मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, जुन्या नोटा वैध असून त्या चलनात कायम रहातील.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे’.

‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वरील वेब सिरीज ‘तांडव’मधून भगवान शिवाचा अवमान !

बहुसंख्येने हिंदू रहात असलेल्या देशात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशा वेब सिरीज देशात चालू असणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! काही धर्मप्रेमी वगळता इतर हिंदू हे मृतवत आहेत. त्यामुळेच हिंदु धर्मावर अशा प्रकारे आघात होतात !

पाकने रा.स्व. संघावर बंदी घालण्याची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केल्याचा पाकच्या प्रसारमाध्यमांचा दावा

संघावर बंदी घालण्याचा विचार करण्यापेक्षा पाकला विनाशाकडे घेऊन जाणार्‍या आतंकवादी संघटनांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर पाकने बंदी घालून त्यांच्या देशाला वाचवावे !

‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !

आतापर्यंत आपण संकेतस्थळ पहाणार्‍यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे, ‘लाईव्हस्ट्रीम’ इत्यादी विषयी माहिती वाचली. आज अंतिम भाग येथे देत आहोत.

सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही ! – जयंत पाटील

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वरील आरोपांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे, असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. नगर येथील एका कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘अ‍ॅमेझॉन किंडल’वर हिंदु धर्म आणि महिला यांच्यावरील अश्‍लील पुस्तकांची विक्री : एक सुनियोजित षड्यंत्र !

या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.

पाद्य्रांच्या पापांची स्वीकृती ?

केरळ येथील चर्चमधील ‘कन्फेशन’ (पापांच्या स्वीकृती) प्रथा बंद करण्यासाठी ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.