रेल्वेच्या अवैध तिकीटविक्री प्रकरणी तीन दलालांना अटक

मुंबई – मुंबईमध्ये मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृत विक्री करणार्‍या तीन दलालांना अटक करून त्यांच्याकडून ४०० ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत. हस्तगत केलेल्या तिकिटांचे एकूण मूल्य ६ लाख रुपयांहून अधिक आहे.

वाशी नाका येथे २३ डिसेंबर या दिवशी अटक केलेल्या नरेंद्र प्रजापतीकडून  ४ लाख ९१ सहस्र १५० रुपये किमतीची २७३ तिकिटे हस्तगत करण्यात आली. रे रोड येथे अटक केलेल्या शमीम शेखकडून ६८ ई-तिकिटे आणि वाशी नाका येथून अटक केलेल्या शक्ती चौधरीकडून ५९ ई-तिकिटे हस्तगत करण्यात आली आहेत.