३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखा ! 

हिंदु जनजागृती समितीचे निवेदन 

प्रतिकात्मक चित्र

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), ३१ डिसेंबर (वार्ता.) – ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाणे आणि  प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वामन बिलावर, वासू बिलावर, किसन बिलावर, आप्पासाहेब बिलावर, सचिन बिलावर उपस्थित होते.