महाशिवरात्रीच्या दिवशी ताजमहाल येथे हिंदु महासभेकडून शिवपूजन

ताजमहाल ही हिंदूंची वास्तू असून तेथे शिवालय होते, याचे अनेक पुरावे आहेत. त्या भावापोटी हिंदू तेथे जाऊन पूजा करतात. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद न घेता अशा प्रकारे अटक होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात शिवशक्ती यागास प्रारंभ

प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, तसेच येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन अन् महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे.

साधकांनी नामजप करतांना ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा करण्याचे लक्षात आलेले महत्त्व !

ईश्‍वरी राज्याची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले समष्टी जप करतांना साधकांनी ‘वायुतत्त्वा’ची मुद्रा (ज्ञानमुद्रा किंवा ध्यानमुद्रा) न करता ‘आकाशतत्त्वा’ची मुद्रा केल्यास जगभरच्या समष्टी प्रसाराला गती मिळेल.

शिवोपासनेची वैशिष्ट्ये आणि शास्त्र

शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्‍या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.

शिवाचे कार्य

जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्‍वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !

शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.  

समर्थभक्त माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपंचायतन यज्ञ पार पडला !

समर्थभक्त श्री. माधवराव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील काशीविश्‍वेश्‍वर देवालय येथे शिवपंचायतन यज्ञ पार पडला.

कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना शिवासंदर्भात भजन ऐकतांना भगवान शिवाच्या तिसर्‍या नेत्रासंदर्भात आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे

‘भगवान शिवाचे तिसरे नेत्र म्हणजे संपूर्ण विश्‍वाला सामावून घेणारे स्थान असून यायोगेे शिव भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व काळांचे ज्ञान ठेवू शकतो’, असे वाटले.