उद्या २६ फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने…
‘एकदा मी भगवान शिवाशी संबंधित ‘पोस्ट’ (सामाजिक प्रसार माध्यमांवर ठेवण्यासाठी संदेश) सिद्ध करत होते. शिवाने त्रिपुरासुराचा वध करून विजयश्री प्राप्त केली. तेव्हा शिवाच्या विजयानिमित्त देवतांनी त्याचे जल्लोषात स्वागत करून आनंद व्यक्त केला. त्या वेळी ‘पार्वतीदेवीने शिवाची प्रेमाने आणि कौतुकाने आरती केली असावी’, असे मला वाटले. त्यानंतर अशा स्वरूपाचे दृश्य चित्रस्वरूपात माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. ते चित्र रेखाटण्याची प्रेरणा मला कुणीतरी आतून दिली आणि माझ्याकडून त्या संदर्भात चित्र काढून घेतले. अशा स्वरूपाचे चित्र मी कुठेही पाहिले नव्हते, तरीही त्या चित्रातील दृश्य मी प्रत्यक्ष अनुभवले. ते चित्र रेखाटतांना मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. मी ते चित्र रेखाटत असतांना माझे शिवाशी अखंड अनुसंधान राहिले. माझा अधूनमधून शिवाचा नामजप होत होता.
२. ‘शिवाच्या डोळ्यांची हालचाल होत आहे. शिव पार्वतीकडे आणि सर्वत्र पहात आहे’, असे मला जाणवले.
३. माझी भावजागृती झाली आणि मला आनंद मिळाला.
४. चित्र पूर्ण झाल्यावर माझी बराच वेळ भावावस्था टिकून होती. कर्पूरवर्ण असलेल्या भगवान शिवाचे अस्तित्व मला अनेक घंटे अनुभवता आले. त्या वेळी देवाने मला शांती आणि आनंद यांची अनुभूती दिली.
‘प.पू. गुरुमाऊली, ‘मला आनंद मिळावा’, यासाठीच आपणच मला वरील सर्वकाही सुचवले आणि माझ्याकडून चित्र रेखाटून घेतले. आपणच माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करून घ्यावेत’, अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |