बेंगळुरू (कर्नाटक) – महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुसर्या दिवशी (२७ फेब्रुवारीला) हिंदु कर्मचार्यांना सुटी द्यावी, अशी विनंती हिंदू नेत्यांनी राज्यशासनाला केली आहे. रमझानसाठी मुसलमान कर्मचार्यांना प्रतिदिन एक घंटा लवकर कार्यालयातून घरी जाण्यास अनुमती द्यावी, असे पत्र मुसलमान नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यानंतर लगेचच हिंदू नेत्यांनी वरील अशी मागणी केली आहे. महाशिवरात्रीला लोक जागरण करत असल्याने दुसर्या दिवशी कार्यालयात जाऊन कामावर जाणे कठीण होते, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे.