सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांतून उत्तरोत्तर उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण, लोलक आणि ‘पी.आय.पी.’ हे तंत्रज्ञान यांचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानांद्वारे केलेल्या नोंदींचे विवेचन आणि संशोधनात्मक चाचण्यांचे निष्कर्ष येथे दिले आहेत.

१. सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे केलेल्या नोंदींचे विवेचन

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. सनातन-निर्मित शिवाच्या कोणत्याही चित्रात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. शिवाच्या चित्रांचे वर्ष, चित्रातील शिवतत्त्वाचे प्रमाण आणि चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीच्या नोंदी पुढे दिल्या आहेत. या नोंदींतून लक्षात येते की, शिवाच्या चित्रांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर वाढत जाऊन वर्ष २०२२ च्या चित्रात ती सर्वाधिक आहे.

टीप १ – ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाने मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने २३०० मीटरपेक्षा अधिक असलेल्या प्रभावळी लोलकाने मोजल्या आहेत.

टीप २ – शिवाच्या चित्रांपैकी ज्या वर्षी सूक्ष्मातून शिवतत्त्वाचे प्रमाण काढलेले नाही, त्या ठिकाणी ‘-’ असे लिहिले आहे.

२. सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांचे ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या नोंदींचे विवेचन

‘शिवाच्या चित्रातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘पी.आय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी, अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पहाता येते. या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्‍याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. या प्रयोगात प्रथम पटलावर पांढरा पुट्ठा ठेवून ‘पी.आय.पी.’ तंत्रज्ञानाद्वारे वातावरणाचे छायाचित्र घेण्यात आले. ही ‘मूलभूत नोंद’ होय. त्यानंतर एकेक करून शिवाची चित्रे ठेवून त्यांची ‘पी.आय.पी.’ छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर ‘शिवाच्या चित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम झाला ?’, हे समजले.

२ अ. ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील (प्रभावळीतील) नकारात्मक अन् सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण, तसेच सकारात्मक स्पंदनांपैकी काही महत्त्वाच्या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)

पुढे दिलेल्या विवेचनात शिवाच्या ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांच्या प्रभावळींची तुलना ‘मूलभूत नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

सौ. मधुरा कर्वे

२ अ १. चाचणीसाठी शिवाचे चित्र ठेवण्यापूर्वी तेथील वातावरणात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण ६४ टक्के आहे.

२ अ २. वर्ष २००० ते २००४ मधील शिवाच्या ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील चैतन्याच्या पिवळ्या रंगाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढणे : शिवाची वर्ष २०००, २००२, २००३ आणि २००४ मधील चित्रे ठेवल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण साधारण ६३ ते ६९ टक्के आहे. विशेष म्हणजे शिवाच्या ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांतील चैतन्याच्या पिवळ्या रंगाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले आहे. (शिवाच्या चित्रांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाने केलेल्या सकारात्मक ऊर्जेच्या नोंदींतूनही असेच दिसून आले. सूत्र ‘१’ मधील सारणी पहावी.)

२ अ ३. वर्ष २०११ ते २०२२ मधील शिवाच्या ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने दिसत असणे : शिवाची वर्ष २०११, २०१५ आणि २०२२ मधील चित्रे ठेवल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण साधारण ७४ ते ९० टक्के आहे, म्हणजे मूलभूत नोंदीच्या तुलनेत ते पुष्कळ वाढले आहे. शिवाच्या ‘पी.आय.पी.’ छायाचित्रांत निळसर पांढरा, पोपटी आणि फिकट गुलाबी हे उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने दर्शवणारे रंग दिसत असून त्यांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले आहे. (शिवाच्या चित्रांच्या लोलकाने केलेल्या चाचण्यांतूनही शिवाच्या चित्रांतील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढत गेल्याचे दिसून आले. सूत्र ‘१’ मधील सारणी पहावी.)

३. संशोधनात्मक चाचण्यांचे निष्कर्ष

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ हे उपकरण, लोलक आणि ‘पी.अाय.पी. (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ हे तंत्रज्ञान यांच्याद्वारे केलेल्या संशोधनात्मक चाचण्यांतून सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेल्याचे स्पष्ट होते.

४. चाचण्यांतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

४ अ. सनातन-निर्मित शिवाचे चित्र साधक-चित्रकारांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच ‘साधना’ म्हणून, तसेच स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार काढलेली असणे : स्पंदनशास्त्रानुसार एखाद्या देवतेचे चित्र किंवा मूर्ती तिच्या मूळ रूपाशी जेवढी अधिक मिळती-जुळती असेल, तेवढी त्या चित्रात किंवा मूर्तीमध्ये त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. चित्रातील देवतेचा आकार, तिचे अवयव, तिच्या अंगावरील अलंकार, तिची शस्त्रे इत्यादी घटक देवतेच्या प्रत्यक्षातील त्या त्या घटकांशी किती प्रमाणात जुळतात, यावरून त्या चित्राची एकूण सत्यता ठरते. प्रत्येक देवतेचे चित्र काढून झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्या चित्राची सात्त्विकता सूक्ष्मातून जाणून ती टक्क्यांमध्ये सांगितली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधक-चित्रकारांना काळानुसार केलेल्या मार्गदर्शनाचे फलित म्हणजे शिवाच्या चित्रांतील सात्त्विकतेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. शिवाच्या चित्रांच्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या चाचण्यांतूनही हे दिसून आले.

४ आ. सनातन-निर्मित शिवाच्या वर्ष २०२२ मधील चित्रात सर्वाधिक (३१.३ टक्के) सात्त्विकता असणे : या कलियुगात मनुष्याने निर्माण केलेल्या देवतेच्या एखाद्या कलाकृतीत, म्हणजे चित्र किंवा मूर्ती यामध्ये अधिकाधिक ३० टक्के सात्त्विकता, म्हणजे सत्यता येऊ शकते. सर्वसाधारण चित्रकाराने काढलेल्या देवतेच्या चित्रात २-३ टक्के सात्त्विकता असते. सनातन-निर्मित शिवाच्या २०२२ मधील चित्रामध्ये ३१.३ टक्के सात्त्विकता येणे, हा सनातनच्या साधक-चित्रकारांच्या उच्चतम भावावस्थेचा परिणाम आहे.

थोडक्यात, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्पंदनशास्त्रानुसार आणि काळानुसार साधक-चित्रकारांना केलेल्या मार्गदर्शनामुळे देवतेच्या चित्रामध्ये उत्तरोत्तर अधिक सात्त्विकता निर्माण झाली. सनातन-निर्मित देवतांची सात्त्विक चित्रे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती देतात. ही सेवा करतांना साधक-चित्रकारांमध्ये ईश्वराप्रती भाव निर्माण झाला. यातून ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणजेच साधनेचे महत्त्व लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.१.२०२५)

ई-मेल : [email protected]


वाचकांना सूचना :

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाची ओळख

या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत.


सनातन-निर्मित भगवान शिवाची चित्रे आणि त्या संदर्भातील ‘पिप’ची छायाचित्रे !

‘उपास्य देवतेच्या चित्रात देवतेचे तत्त्व (तारक रूप असल्यास सात्त्विकता) जेवढे अधिक प्रमाणात असते, तेवढे ते चित्र उपासकाला त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करण्यास अधिक उपयुक्त ठरते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-चित्रकारांनी काढलेली श्री गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, दत्त, शिव, श्री लक्ष्मी आणि श्री दुर्गा या देवतांची चित्रे सनातन संस्थेने प्रकाशित केली आहेत. या चित्रांमध्ये त्या त्या देवतांचे तत्त्व आले आहे. वर्ष २००० ते २०२२ या कालावधीत देवतांच्या चित्रांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी काळानुसार सांगितलेले पालट करण्यात आले. सनातन-निर्मित शिवाच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने संशोधन करण्यात आले. या ठिकाणी त्या त्या वर्षीची शिवाची चित्रे आणि वर्ष २०११ अन् वर्ष २०२२ मधील चित्रांची ‘पिप’ छायाचित्रे दिली आहेत.

भगवान शिवाची चित्रे आणि ‘पिप’ची छायाचित्रे

वर्ष २००० मधील शिवाचे चित्र
वर्ष २००२ मधील शिवाचे चित्र
वर्ष २००३ मधील शिवाचे चित्र
वर्ष २००४ मधील शिवाचे चित्र
वर्ष २०११ मधील शिवाचे चित्र
वर्ष २०१५ मधील शिवाचे चित्र
वर्ष २०२२ मधील शिवाचे चित्र

  • वर्ष २०२२ मधील शिवाचे चित्र सनातन संस्थेच्या ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन कक्षांवर वितरणासाठी उपलब्ध आहे.

  • सनातन संस्थेच्या साधकांनी वर्ष २००० ते वर्ष २०२२ मध्ये काढलेली भगवान शिवाची चित्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.