
पालघर – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (इंदूर) यांच्या कृपाछत्राखाली प.पू. रामानंद महाराज यांच्या आशीर्वादाने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामधील मोरचोंडी येथील प.पू. भक्तराज महाराज आश्रमात श्री मयुरेश्वर महादेव महाशिवरात्र महोत्सव २५ फेब्रुवारीपासून साजरा होणार आहे.
मंगळवार, २५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७.३० ते ८ नित्य या वेळेत आरती आणि रात्री ८ ते ९ भोजन असणार आहे. रात्री ९ वाजता प.पू. भक्तराज महाराज रचित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, २६ फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्र आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वाजता शिवपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या मूर्तीचे पूजन असणार आहे. सकाळी १० वाजता प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांची पालखी मिरवणूक होईल. सकाळी ११ वाजता कळस पूजन आणि ध्वजारोहण, त्यानंतर ११.३० ते दुपारी २ पर्यंत प्रसाद असेल. सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत नित्य आरती आणि रात्री ८ ते ९ प्रसाद असेल. रात्री ९.३० वाजता प.पू. भक्तराज महाराज रचित भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार, २७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ११ ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद (भंडारा) असेल. या उत्सवात उपस्थित राहून भजनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जयराम पांडुरंग कडू (मोरचोंडी) आणि श्री. छंदा दीक्षित यांनी केले आहे.