सासवड (जिल्हा पुणे) येथील मतदान यंत्र चोरी प्रकरणातील ३ अधिकार्‍यांचे निलंबन रहित !

निलंबन रहित होऊन कामावर रुजू झालेल्या अधिकार्‍यांनी पुन्हा मतदान यंत्रांची चोरी केली, तर त्याला उत्तरदायी कोण ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !; संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे.

‘सीव्हिजील ॲप’वर आतापर्यंत ३० तक्रारींची नोंद !

निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे.

INC Manifesto : (म्हणे) ‘३० लाख युवकांना नोकरी देणार !’ – काँग्रेस

काँग्रेसने या देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य केले. सत्तेत असतांना तिने बेरोजगारी का अल्प केली नाही ? त्यामुळे आता तिने काहीही देण्याचे आश्‍वासन दिले, तरी जनतेचा विश्‍वास तिने कायमचाच गमावल्याने जनता तिला घरचाच रस्ता दाखवणार !

मतदान केंद्रांवरील सुविधांविषयी विशेष भर द्या ! – उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

‘मतदान केंद्रांवर वीज, आवश्यक फर्निचर, पंखे, रॅम्प, स्वच्छतागृहे सुस्थितीत असावीत. पिण्याच्या पाण्याची सोय ठेवावी. शिक्षणाधिकार्‍यांनी प्रशिक्षणाविषयी आदेशाची बजावणी करावी’

काय करायचे ? काय करायचे नाही ? याविषयी दक्ष रहा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी याविषयी दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बीड आणि भिवंडी येथील उमेदवार घोषित !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनावणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी या पक्षाचे ५ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

संजय निरूपम यांच्याकडून काँग्रेसचे त्यागपत्र !

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती; मात्र ही जागा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे गटाला देण्यात आली.

नागपूर येथील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही !

बर्वे प्रकरणात राज्य सरकारने नव्याने त्यांच्या चौकशीचे आदेश लागू केले आहेत, तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जातपडताळणी समितीनेही बर्वे यांना नोटीस बजावली होती.

नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र सर्वाेच्च न्यायालयाने वैध ठरवले !

नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने  रहित केला आहे.