कोल्हापूर – निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची तक्रार करण्यासाठी नागरिकांसाठी ‘सीव्हिजील ॲप’ चालू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर आजपर्यंत यावर ३० नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. यावर छाननी करून त्यातील १५ तक्रारी वैध असल्याने त्या पुढील कारवाईसाठी भरारी पथकाकडे देण्यात आल्या. यावर तक्रार प्रविष्ट झाल्यापासून १०० मिनिटांच्या आत भरारी पथकाने तात्काळ कारवाई केली. या तक्रारींमध्ये प्रामुख्याने विनाअनुमती झेंडे लावले, पक्षाचा झेंडा/चिन्ह दर्शनी भागात दिसत आहे, विज्ञापनांचे फलक झाकलेले नसणे अशा स्वरूपाच्या होत्या, अशी माहिती जिल्हा ‘तक्रार निवारण आणि मतदार मदत कक्षा’कडून देण्यात आली.
ज्या तक्रारी प्राप्त होतात, त्यात काढलेले चित्र स्पष्ट नसणे, माहिती अपुरी असणे अशा गोष्टींमुळे त्यावर पुढील कार्यवाही करणे शक्य होत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सीव्हिजील’ संदर्भातील कक्ष २४ घंटे कार्यरत असून तक्रार प्राप्त होताच ५ मिनिटांतच संबंधित भरारी पथकाला ही तक्रार कळवली जाते आणि त्यावर पुढील १०० मिनिटांत कारवाई केली जाते. तरी नागरिकांनी तक्रार देतांना ती सुस्पष्ट छायाचित्रासह योग्य माहिती द्यावी. असे केल्यास तात्काळ कारवाई करणे सोपे जाते, असे आवाहन ‘सीव्हिजील’ कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोबाइल ऐप Google Play स्टोर पर यहां : https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN पर उपलब्ध है: और ऐप्पल स्टोर में यहां: https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541पर उपलब्ध है। |