महाराष्ट्रात ९८ सहस्र ११४ मतदान केंद्रांमध्ये होणार मतदान !

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे, तर मुंबईमध्ये ७ सहस्र ३८० मतदान केंद्रे आहेत.

मतदानासाठी सुटी न दिल्यास खासगी आस्थापनांवर कारवाई करू ! – मुंबई निवडणूक अधिकारी

मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात २० मे या दिवशी मतदान होणार आहे.

महायुतीला पाठिंबा द्या ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केले.

मराठवाड्यातून लोकसभेच्या निवडणुकीसाठी २०४ उमेदवार रिंगणात ! – राज्य निवडणूक आयोग

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे.

‘भगवा आतंकवाद’ म्हणणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देतो ! – राम सातपुते, भाजप

‘भगवा आतंकवाद म्हणणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा’, असे म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली.

हिंदु राष्ट्र नको, रामराज्य हवे !

पहिल्या टप्प्यात देशात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, पुढे त्याचे रामराज्याच रूपांतर करायचे आहे ! त्यामुळे साक्षी महाराजांनी प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे महायुतीची अनुकूलता विजयात परावर्तित होईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हापासून हिंदुत्वाचे सूत्र मनसेने हाती घेतले, तेव्हापासून त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.

#Loksabha : रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ मिळून आतापर्यंत २४ कोटी रुपयांचा ऐवज कह्यात ! – रमेश वर्मा, मुख्य निवडणूक अधिकारी, गोवा

गोव्यासारख्या छोट्या राज्यात ही स्थिती, तर देशभरात मिळून निवडणुकीच्या काळात अशी कृत्ये किती मोठ्या प्रमाणात होत असतील, याचा विचारच करायला नको !

चुकीचे विचार रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना सक्षम आहे  ! – खासदार विनायक राऊत

लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांकडून विकृत वाणी बाहेर पडेल, यापुढे जिल्ह्यात दादागिरी चालणार नाही. यापूर्वी गडचिरोली, नंतर सिंधुदुर्ग जिल्हा संवेदनशील जिल्हा झाला होता.

आचारसंहितेच्या काळात ‘मेट्रो’च्या खांबांवरील विज्ञापनांवर कारवाई करा !

‘मेट्रो’च्या मार्गांवरील खांब तुमच्या मालकीचे असून त्यावर आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही विज्ञापन करू देऊ नका. विज्ञापन लावल्यास तात्काळ कारवाई करा, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून ‘महामेट्रो’ प्राधिकरणाला देण्यात आले आहे.