भावना गवळी यांना वार्‍यावर सोडणार नाही ! – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-नांदेड मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. तेथे गेल्या २५ वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

राज्यातील ६५ गावांचा मतदानावर बहिष्कार !

नेते आणि प्रशासन यांच्या कुचकामी धोरणांमुळे मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घालणे, हे व्यवस्थेचे अपयशच !

पिण्याच्या पाण्यासाठी जेजुरीकरांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मागणी करावी लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयश !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीच्या कालावधीत निकालाचे अनुमान घोषित करण्यावर प्रतिबंध !; सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणार्‍यांना ऑनलाईन दंड !…

१९ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून १ जून या दिवशी सायंकाळी ६.३० पर्यंत निवडणूक अनुमान घोषित करण्याला प्रतिबंध आहे.

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे (बंदुका) शासनाधीन !

अनुमतीप्राप्त ३ सहस्र २२८ अग्नीशस्त्रांपैकी १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात शासनाधीन करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याच्या प्रकरणी बारामतीत विस्तार अधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘सी व्हिजिल ॲप’वर आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करता विनाअनुमती मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकार्‍यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट उत्तर दिल्याची घटना बारामतीत घडली आहे.

निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषित !

निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक मतदार संख्या झाल्यास कराड, माण आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये…

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची घोषित !

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची दुसरी सूची ३ एप्रिल या दिवशी घोषित केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील..

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, यावर आम्ही आजही ठाम ! – उद्योगमंत्री उदय सामंत

कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.

एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !

नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे गृहमंत्री योगी आदित्यनाथ हेही या सभांना उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती भाजपने दिली आहे.