ओडिशातील श्री जगन्नाथ मंदिराला धोका ठरणारा ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ थांबवा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! ओडिशा सरकार हिंदूंच्या मंदिरांसंदर्भात असा निर्णय कसा काय घेऊ शकते ? या मनमानी कारभाराच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक आहे !

उत्तराखंडमधील हरिद्वारच्या धार्मिक स्थळांसमवेत ६ रेल्वेस्थानकांना बाँबने उडवण्याची ‘जैश-ए-महंमद’ची धमकी !

हिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या !

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

हिमाचल प्रदेशातील मंदिरांना अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या विनियोगाचा प्रशासनाला मिळाला अधिकार !

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असतांना असा निर्णय घेणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भोर (पुणे) येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात चोरी

भोर तालुक्यातील दिवळे गावातील ग्रामदैवत असणाऱ्या देऊळजाईमाता मंदिरातील देवीचे सवा किलो वजनाचे चांदीचे दोन मुखवटे आणि चांदीचे आवरण असलेली देवीची मूर्ती असा एकूण ५८ सहस्र किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

(म्हणे) ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदू ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करतात !’ – मिकी पाशेको

जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?

हिंदूंची गळचेपी करणारे कायदे रहित करा !

काशी विश्वनाथ आणि द्वारका येथे भव्य मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदूंनी दबावगट निर्माण करावा ! 

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची वारंवार तोडफोड होते, याचा अर्थ उत्तरप्रदेशात मूर्तीभंजक मोकाट आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलीस काय करत आहेत ?

कोटा (राजस्थान) येथील मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीवर ७८६ लिहिलेले पत्रक चिकटवल्याने हिंदू संतप्त !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर आणि त्यांची धार्मिक स्थळे अन् धार्मिक मिरवणुका यांवर आघात होत आहेत. याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवून काँग्रेस सरकारला संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

अलवर (राजस्थान) येथे ३०० वर्षे जुने शिवमंदिर अनधिकृत ठरवून पाडले !

देहलीतील जहांगीरपुरी येथील धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यावर धावून जाणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते काँग्रेसच्या राज्यात हिंदूंचे जुने मंदिर पाडल्यावर गप्प का आहेत ?