कोटा (राजस्थान) येथील मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीवर ७८६ लिहिलेले पत्रक चिकटवल्याने हिंदू संतप्त !

(७८६ हा इस्लाममधील पवित्र आकडा आहे. या आकड्याचे स्मरण केल्यास कार्यामध्ये यश मिळते, अशी मुसलमानांची श्रद्धा आहे.)

कोटा (राजस्थान) – कोटा जिल्ह्यातील अयाना गावामध्ये असणाऱ्या राधेश्याम वैष्णव मंदिरातील श्री हनुमानाच्या मूर्तीवर उर्दू भाषेत लिहिण्यात आलेले एक पत्रक चिकटवण्यात आले. त्यात ‘७८६’ असे लिहिण्यात आले होते. या घटनेमुळे स्थानिक भाविकांनी संताप व्यक्त करून पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे. ‘या प्रकरणी २४ घंट्यांत दोषींना अटक केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथे अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर आणि त्यांची धार्मिक स्थळे अन् धार्मिक मिरवणुका यांवर आघात होत आहेत. याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवून काँग्रेस सरकारला संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !