हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
भोर (पुणे) – भोर तालुक्यातील दिवळे गावातील ग्रामदैवत असणाऱ्या देऊळजाईमाता मंदिरातील देवीचे सवा किलो वजनाचे चांदीचे दोन मुखवटे आणि चांदीचे आवरण असलेली देवीची मूर्ती असा एकूण ५८ सहस्र किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना ७ मेला पहाटे ४ वाजता घडली. मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय निवृत्ती कुलकर्णी (वय ४२ वर्षे) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.