श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांनी मंदिरातील शिवलिंगाची केली तोडफोड !

अशी घटना एखादे चर्च किंवा मशीद यांच्‍या संदर्भात घडली असती, तर ‘देशात अल्‍पसंख्‍यांक असुरक्षित आहेत’, अशी आरोळी ठोकण्‍यात आली असती आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्‍यात आले असते; मात्र हिंदूंच्‍या संदर्भात ही घटना घडल्‍याने सर्व जण शांत आहेत !

किशनगंज (बिहार) येथे आग लागल्याने मंदिर जळून खाक !

गावकर्‍यांना संशय आहे की, मंदिराची तोडफोड करून त्यास आग लावण्यात आली. यामुळे त्यांनी येथे निदर्शने करून ‘रस्ता बंद’ आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

गोवा : पैशांच्या लोभापायी पेडणे येथे देवस्थानच्या भूमीही विकण्याचा घाट

गावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती आणि परंपरा ही मंदिरांवर अवलंबून आहे. अलीकडील काही मासांमध्ये देवस्थानच्या भूमी विकण्याचा घाट घातला जात आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

महाराष्ट्रातील देवस्थानच्या भूमी हडप करणारी यंत्रणा कार्यरत 

देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्‍यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.

अरण्येश्‍वर (पुणे) भागात घरात असलेल्या काळूबाई मंदिरात दागिने आणि पैसे यांची चोरी !

हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणे, हे दुर्दैवी !

सिंधुदुर्ग : असलदे येथे २ मंदिरांत चोरी,  तर शाळेत चोरीचा प्रयत्न

येथील श्री रामेश्वर मंदिर आणि डामरेवाडी  येथील श्री साईमंदिर येथील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली, तसेच गावठाण, असलदे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीतील कपाट तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

बांगलादेशात दुर्गादेवीच्या मंदिरावर अतिरेकी मुसलमानांचे आक्रमण !

ढाका येथील ठाकूरगाव जिल्ह्यात असलेल्या रुहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गादेवीच्या मंदिरावर अतिरेकी मुसलमानांनी आक्रमण केले.