राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) येथील श्री कानिफनाथ मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण !

  • पुजारी आणि भक्त यांना मारहाण

  • मंदिर नसून दर्गा असल्याचा केला जात आहे दावा !

मुंबई – राहुरी तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) गुहा गावातील श्री कानिफनाथ मंदिरात ऐन दिवाळीत धर्मांध मुसलमानांनी धुमाकूळ घातला. दीपावलीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भजनांचा कार्यक्रम चालू असतांना अचानकपणे धर्मांध मुसलमानांच्या जमावाने ‘हे मंदिर नसून दर्गा आहे’ असे सांगत मंदिरातील पुजारी आणि भाविक यांना मारहाण केली अन् तेथे चालू असलेली पूजा आणि भजन बंद पाडले. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात पुजारी आणि भक्त यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ही घटना ९ नोव्हेंबरला घडली. या प्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, लवकरच आरोपींना पकडले जाईल.

तहसीलदारांनी दिली होती पूजा करण्याची अनुमती !

हे मंदिर नाथसंप्रदायातील गुरु कानिफनाथांचे आहे. येथे त्यांची संजीवन समाधी आहे; मात्र ही जागा दर्ग्याची असल्याचा काही मुसलमानांचा दावा आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. ही भूमी मंदिराच्या अखत्यारीत असतांना त्यावर वक्फ बोर्डानेही दावा केल्याचे स्थानिक सांगतात. येथे पूजा आणि आरती करण्याची मागणी हिंदूंनाच करावी लागते, याविषयी स्थानिक हिंदूंमध्ये आश्‍चर्य अन् संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना वारंवार निवेदनेही दिली जातात. तहसीलदारांनी हिंदूंना येथे पूजा करण्याची अनुमती दिली. ती मिळाल्यानंतर हिंदूंनी तेथे साफसफाई करून पूजेची सिद्धता केली. त्यानंतर मुसलमानांनी आक्रमण केले.

समाधी मंदिराचा दरवाजा माती टाकून बुजवला !

येथे प्रत्येक अमावस्येला पूजा-अर्चा, आरती आणि महाप्रसाद असतो. वर्षानुवर्षे हे चालू आहे. स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, वाद होण्याचे कारण एकच की, हे आमचे ग्रामदैवत आहे. गुहेला नाव कानिफनाथांमुळे पडलेले आहे; पण वक्फ बोर्डाने ‘रमझान शहा दर्गा’ यांचे हे ठिकाण आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या वादाला प्रारंभ झाला. तो दर्गा नाही, तर ते आमचे ग्रामदैवत आहे. ते समाधी मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे; पण तो समाधी मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला. माती टाकून बुजवण्यात आला.

  • श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून पूजा-भजन बंद पाडणे, पुजारी-भाविकांना मारहाण करणे, ही धर्मांधांची ‘मोगलाई’च !

  • घटनेमागील मुख्य सूत्रधार शोधून काढण्याची ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात पूजा-भजने बंद पाडून हिंदूंना मारहाण केली जात आहे, ही घटना मोगलाईची आठवण करून देणारी आहे. या घटनेचा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना कायदा हातात घेऊन ऐन दिवाळीत हिंदूंवर आक्रमण करणे अतिशय गंभीर आहे. हे काय कमी होते म्हणून ५८ हिंदूंवरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हिंदूंवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, तसेच गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यामागे काही षड्यंंत्र आहे का ?, या घटनेमागे कोण सूत्रधार आहे?, यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केली आहे.

‘अहमदनगर’चे नाव बदलून मंदिरांचे जतन-संवर्धन करणार्‍या अहिल्याबाईंच्या नावाने ‘अहिल्यानगर’ केले असले, तरी अद्याप तेथील ‘अहमदा’च्या वंशजांची प्रवृत्ती पालटलेली नाही. या गावात मंदिराच्या बाजूला बेकायदेशीरपणे दर्गा निर्माण करून मंदिराची ३२ एकर जागा ‘वक्फ बोर्डा’च्या घशात घालण्याचा कुटील डाव चालू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तसेच येथे नियमित प्रत्येक गुरुवारी, तसेच प्रत्येक अमावास्येला नित्य पूजा-अर्चा केली जाते. असे असतांना हिंदूंवर थेट आक्रमण करण्यात आले. हा न्यायालयाचा अवमान आहे, हिंदु समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि गावातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचाही प्रयत्न आहे, असेही ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने म्हटले आहे.