अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदूंवरील आक्रमणांमध्ये वाढ होऊ लागली आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळांना अपवित्र केले जात आहे. महिलांवर बलात्कार होत आहेत. हिंदूंच्या हत्या होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हिंदूंनी पलायन करायलाही आरंभ केला आहे. अल्प किंमतीत घर, भूमी आणि संपत्ती विकून ते स्थानांतर करू लागले आहेत. सत्ताधारी शेख हसीना असो कि विरोधी पक्ष खलिदा जिया यांचा पक्ष असो, दोघांच्या धर्मांध मुसलमान नेत्यांकडून हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशातील हिंदू पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाला समर्थन देतात. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्या खलिदा जिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या कार्यकर्त्यांकडून हिंदूंवर अधिक अत्याचार केले जात आहेत.
१. बांगलादेशातील ‘कालबेला न्यूज’च्या वृत्तानुसार खुलना जिल्ह्याच्या शैलकुपा उपजिल्ह्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी सत्येंद्रनाथ साहा या मृत हिंदु व्यक्तीच्या घरावर नियंत्रण मिळवून तेथे ४ मजली इमारत बांधली आहे. ‘जुबो लीग’चे अध्यक्ष शमीम हुसैन मुल्ला आणि त्यांचे वडील सबदर हुसैन मुल्ला यांच्यावर या संदर्भात आरोप आहे. ‘जुबो लीग’ ही संघटना पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘बांगलादेश अवामी लीग पार्टी’ची युवा शाखा आहे. या उपजिल्ह्यातून हिंदू पलायन करत आहेत.
२. या प्रकरणी सत्येंद्रनाथ यांच्या सुनेने सांगितले की, ‘जुबो लीग’च्या नेत्याने आमच्या घरावर आणि काली मंदिर यांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक खासदार महंमद अब्दुल हई यांच्याकडे तक्रार करूनही अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.
३. ६ नोव्हेंबर या दिवशी याच उपजिल्ह्यातील बिजुलिया गावामध्ये धर्मांध मुसलमानांनी एका मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली होती. अवामी लीगच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही तोडफोड करण्यात आली. १३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कोमिलानगर येथे हिंदू निदर्शने करत असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले होते. यात काही जण घायाळ झाले होते.
हिंदूंंची ‘बांगलादेश अवामी लीग’कडे कारवाई करण्याची मागणी !
यावर्षी एप्रिल मासामध्ये शैलकुपा उपजिल्ह्यातील पूजा समितीने ‘बांगलादेश अवामी लीग’कडे हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात निष्क्रीय रहाणारे खासदार महंमद अब्दुल हई यांना निवडणुकीत तिकीट न देण्याची मागणी केली आहे. हिंदूंनी पंतप्रधान शेख हसीना यांना म्हटले आहे की, ज्या लोकांनी मंदिराला अपवित्र केले आहे, हिंदूंची घरे जाळली आहेत, अन्य अत्याचारांमध्ये जे सहभागी आहेत, तसेच त्यांना वाचवण्यामध्ये जे सहभागी आहेत, त्यांना निवडणुकीत तिकीट देण्यात येऊ नये.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापित होणे आवश्यक आहे ! |