तोडफोड करणार्यांना फाशी देण्याची केली मागणी !
रांची (झारखंड) – रांची जिल्ह्यातील मांडर येथे हिंदूंच्या ४ मंदिरांत तोडफोडीच्या घटना घडल्या. मंदिरांतील मूर्तींचीही तोडफोड झाल्याचे समोर आल्यानंतर येथील संतप्त जनतेने तीव्र आंदोलन केले. १७ नोव्हेंबरच्या सकाळी या घटना घडल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही घंट्यांतच सहस्रावधी हिंदू हातात लाठ्या-काठ्या घेऊन एकत्र आले. त्यांनी रांची-डालटनगंज हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५ विविध ठिकाणी बंद केला. वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचार्यांसह अधिकारीही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी उपस्थित झाले. ते लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
१. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
२. मंदिरांवर आक्रमण करणार्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी रस्त्यावर टायरही जाळण्यात आले.
३. पोलिसांनी तोडफोड करणार्यांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
४. भाजपचे झारखंड राज्याचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी धार्मिक स्थळांची तोडफोडीच्या घटनांविषयी खंत व्यक्त केली असून एका धर्माच्या लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरेप केला. तोडफोड करणार्यांना त्वरित अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.
संपादकीय भूमिका
|