रुग्णालयाची दुरवस्था पाहून विधानसभा अध्यक्षांनी अधिकार्‍यांना खडसावले !

रुग्णांच्या आरोग्याप्रती असंवेदनशील असणार्‍या रुग्णालय प्रशासनातील संबंधितांवर कठोर कारवाईच करायला हवी !

पाचव्या मजल्यावरून खाली पडून बालिकेचा मृत्यू

तिच्या घराच्या खिडकीला बाहेरून लोखंडी जाळ्या नव्हत्या. त्यामुळे तेथून तोल जाऊन ती खाली पडली.

ठाणे येथे देवीच्या मिरवणुकीत फटाके फोडल्याने भांडण !

हिंदूंनो, क्षुल्लक कारणांवरून भांडण्यापेक्षा सण-उत्सव यांच्या काळात एकोपा टिकवून ठेवून संघटित रहा !

ससून रुग्णालयाची नकारात्मक प्रतिमा खपवून घेणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी ससून रुग्णालयाच्या संदर्भातील तक्रारींसह तेथील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. डॉ. ठाकूर यांनी रुग्णालयाच्या विविध अंतररुग्ण, बाह्यरुग्ण, शस्त्रक्रिया, तसेच मृत्यूमुखींची माहिती देणारे सादरीकरण केले.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथील वसाहत रुग्णालयातील रुग्णांवर वेळेत योग्य उपचार व्हावेत ! – राजू यादव

निवेदन स्वीकारल्यावर वैद्यकीय अधीक्षक विद्या पॉल यांनी ‘यापुढे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार करू’, असे आश्वासन दिले. या प्रसंगी विक्रम चौगुले, योगेश लोहार, राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, दीपक धिंग यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ललित पाटील याच्या घरावर धाड !

‘ससून सर्वोपचार रुग्णालया’मध्ये वैद्यकीय उपचार घेत असतांना ललित पाटील हा अमली पदार्थांची विक्री करत होता. सध्या तो पसार झाला आहे. पोलिसांनी त्याच्यासह ३ आरोपींच्या नाशिक येथील घरांवर धाडी टाकल्या.

लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका ! – गोवा खंडपिठ

राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत

रुग्‍णांना धर्मादाय रुग्‍णालयातील सेवा घेण्‍यासाठी ‘भ्रमणभाष अ‍ॅप’ चालू करणार ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्‍यमंत्री

धर्मादाय रुग्‍णालयांमधून सर्वसामान्‍य नागरिकांना आवश्‍यक आरोग्‍य सेवा चांगल्‍या प्रकारे मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी नेहमीच शासनाकडे येत असतात.

परभणी येथे चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप !

येथील जिल्हा सामान्य अस्थिव्यंग रुग्णालयात भारत मोरे (वय ४० वर्षे) रुग्णाचा ६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. आधुनिक वैद्यांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला.

सिंधुदुर्ग : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था न सुधारल्यास आंदोलनाची चेतावणी

यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ? दुर्गम भागातील शासकीय रुग्णालयांकडे प्रशासनाचे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक !