देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?

नागपूर येथील शासकीय रुग्‍णालयांत २४ घंट्यांत २५ रुग्‍णांचा मृत्‍यू नाही ! – डॉ. सागर पांडे, वैद्यकीय अधीक्षक

मेयो आणि मेडिकल या दोन्‍ही रुग्‍णालयांत अत्‍यवस्‍थ अन् ‘व्‍हेंटिलेटर’वरील रुग्‍णांचे दिवसाला ५-६ मृत्‍यू होत आहेत, अशी माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली.

८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिर’ !

धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालय कोल्‍हापूर विभाग, कोल्‍हापूर ‘रिजन ट्रस्‍ट प्रॅक्‍टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्‍हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्‍णालये यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रविवार, ८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिरा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

महिला उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन !

ससून रुग्‍णालयाच्‍या परिसरात ‘मॅफेड्रीन’ अमली पदार्थ सापडला. त्‍यानंतर आरोपी ललित पाटील याने रुग्‍णालयातून पलायन केले. या दोन्‍ही प्रकरणांत कर्तव्‍यात हलगर्जीपणा केल्‍याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह ९ पोलीस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्‍यात आले आहे.

नांदेड, संभाजीनगर येथील रुग्‍णांच्‍या मृत्‍यूचा सविस्‍तर अहवाल केंद्र सरकारने मागवला !

चुकीच्‍या पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय चालत असेल, तर कारवाई केली जाते. जिथे सुविधा नसतील, अशा वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्‍यात आला आहे.

नांदेड प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

यापूर्वीच्‍या अनेक प्रकरणांमध्‍ये रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍यावर सरकार अन्‍वेषणाचे आदेश देते, अन्‍वेषण समित्‍या नेमल्‍या जातात; मात्र त्‍यांचे पुढे काय झाले ? किती जणांवर कारवाई झाली ? हे कधीच समोर येत नाही.

नांदेड रुग्‍णालयातील रुग्‍णांच्‍या मृत्‍यूची चौकशी करण्‍यात येणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

राज्‍याच्‍या सचिवांनी दिलेल्‍या माहितीनुसार या रुग्‍णालयात औषधांची कोणतीही कमतरता नव्‍हती. औषधांसाठी १२ कोटी रुपये संमत करण्‍यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर – येथील शासकीय घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना इतर रुग्णालयांतून गंभीर अवस्थेत असतांना भरती करण्यात आले आहे.

नांदेडमधील शासकीय रुग्‍णालयात २४ घंट्यांत २४ रुग्‍णांचा मृत्‍यू !

यामध्‍ये १२ नवजात बालकांचा समावेश असून सर्पदंश आणि विषबाधा यांमुळे १२ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता यांनी ‘मृतांमध्‍ये बाहेरील रुग्‍णांचा अधिक समावेश होता’, असे स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

पंजाबमध्ये अकाली दलाच्या नेत्याची हत्या

होशियारपूर येथून १५ किमी अंतरावर असणार्‍या मेगोवाल गंजियान या गावात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुरजित सिंह आंखी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.