राज्यातील मनोरुग्णालयांमध्ये ५०० पदे रिक्त !

प्रतिकात्मक छायाचित्रं

मुंबई – मानसिकदृष्ट्या आजारी रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी येथे मनोरुग्णालये चालू केली आहेत. तेथे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून तेथील विविध प्रवर्गांतील ५०० पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत, ही माहिती माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांना दिली. (महिनोन्महिने पदे रिक्त कशी रहातात ? यावर कुणाचे लक्ष कसे नाही ? यावर उपाययोजना काढणे आवश्यक ! – संपादक)

पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. ठाणे मनोरुग्णालय प्रमुख डॉ. नेताजी मुळीक म्हणाले की, ठाणे मनोरुग्णालयातील पदभरतीची प्रक्रिया चालू आहे. ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील काही पदे भरली असून प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांच्या माध्यमातून उर्वरित पदे भरण्यात येत आहेत. ‘ड’ वर्गाच्या काही निकषांविषयीचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्या भरतीला विलंब होत आहे.

संपादकीय भूमिका

पदे रिक्त असल्यामुळे मनोरुग्णांवर उपचार करणार्‍यांनाच ताण येत असेल, तर ते रुग्णांवर उपचार कसे करणार ?