Karnataka Doctor Attacked : चिक्‍कमगळुरू (कर्नाटक) येथे बुरखाधारी महिलेकडून आधुनिक वैद्याला मारहाण !

चिक्‍कमगळुरू (कर्नाटक) – येथील अरळगुप्‍पे मल्लेगौडा जिल्‍हा रुग्‍णालयात एका बुरखाधारी महिलेने एका आधुनिक वैद्यांवर आक्रमण केल्‍याची घटना नुकतीच घडली. आक्रमण करणारी ही महिला नंतर पसार झाली. रुग्‍णालयातील वैद्य आणि इतर कर्मचारी यांनी या घटनेचा निषेध करत बाह्य रुग्‍ण विभाग (ओपीडी) काही काळ बंद ठेवले. (कर्नाटकात काँग्रेसच्‍या राजवटीत धर्मांध मुसलमान छुल्लक कारणावरून कायदा हातात घेण्‍याचे धाडस करतात. यावरून त्‍यांच्‍यावर पोलीस आणि प्रशासन यांचा धाक राहिलेला नाही, हे दिसून येते. हिंदूंनी स्‍वरक्षणासाठी संघटित होणे, ही काळाची गरज आहे ! – संपादक)

याविषयीच्‍या एका वृत्तानुसार एका प्रकरणाविषयी २ गटांत भांडण झाले होते. नंतर एका गटातील एक तरुण रुग्‍णालयात उपचारासाठी भरती झाला. या वेळी त्‍या तरुणाची बुरखाधारी बहीण त्‍याच्‍यासोबत होती. उपचाराच्‍या वेळी आधुनिक वैद्य व्‍यंकटेश यांनी तिला शिवीगाळ केल्‍याचा आरोप करत रुग्‍णाच्‍या त्‍या बुरखाधारी बहिणीने वैद्य वेंकटेश यांच्‍या शर्टला धरून त्‍यांना मारहाण केली आणि तेथून पसार झाली. या मारहाणीच्‍या घटनेनंतर रुग्‍णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. रुग्‍णालयाच्‍या कर्मचार्‍यांनी याचा निषेध केला आणि सुरक्षा पुरवण्‍याची मागणी केली.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्‍या राज्‍यात मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून अशा कृती होत आहेत. उद्या अशांमुळे राज्‍यात अराजक माजल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !