गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात तरुणावर आक्रमण करून हत्या होत असतांना जनता निष्क्रीय !

ही स्थिती भारतियांना लज्जास्पद होय ! अशा घटनांच्या वेळी जनता पुढे न येण्याचे एक कारण पोलिसांकडून नंतर होणारा त्रास ! पोलीस जनतेचे मित्र नसल्याने जनताही त्यांना साहाय्य करण्यास पुढे येत नाही !

इंग्लंड येथून आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक करा ! – रोहन खंवटे, आमदार

काणकोण येथे ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत १६ जण इंग्लंड येथून काणकोण येथे आले आहेत आणि यामधील ५ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वसई (जिल्हा पालघर) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून रस्त्यावर फेकणार्‍या नराधमाला अटक

मुंबई उपनगरातील वसई येथे एका वासनांधाने ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून ती मृत झाली आहे, असे समजून पिशवीत भरून रस्त्यावर फेकून दिले. पोलिसांनी या नराधमाला अटक केले असून त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.

दर नियंत्रणाच्या आदेशाला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने ‘आय.एम्.ए.’ची नाराजी !

कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना त्यांच्याप्रमाणे दर निश्‍चित करू द्या.=हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

पुणे येथे ‘प्लाझ्मा’ बॅगच्या किमतींमध्ये तफावत !

आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्याचा त्रास रुग्णांना होतोे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक टाळावी !

खासगी रुग्णालयांवर कोरोना उपचारांसाठीच्या शुल्कावर मर्यादा घालण्याची आवश्यकता ! – सर्वोच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून हे करणे जनतेला अपेक्षित आहे !

सर्व कोरोना रुग्णालयांनी आगीच्या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, अन्यथा करवाई ! – सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश

अशा गोष्टीही जर न्यायालयाला सांगावे लागत असतील, तर प्रशासन, अग्नीशमनदल आणि सरकारी यंत्रणा काय कामाच्या ?

कोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथे अवैध गर्भलिंग चाचणीप्रकरणी आधुनिक वैद्य अरविंद कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद

एकदा कारवाई होऊनही परत त्याच प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई होते, याचा अर्थ पूर्वी झालेली कारवाई पुरेशी नव्हती, हेच सिद्ध होते.

सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली 

सिंधुदुर्गात कोरोनाबाधित गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १४

राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये यांमध्ये काम करणार्‍या परिचारिकांच्या समस्यांचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर !

कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.