सर्व कोरोना रुग्णालयांनी आगीच्या संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, अन्यथा करवाई ! – सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश

  • अशा गोष्टीही जर न्यायालयाला सांगावे लागत असतील, तर प्रशासन, अग्नीशमनदल आणि सरकारी यंत्रणा काय कामाच्या ?
  • रुग्णांच्या सुरक्षेचा विचार न करणारी रुग्णालये जनताद्रोहीच होत ! अशांवर कारवाई केली पाहिजे !

नवी देहली – देशातील सर्व कोरोना रुग्णालयांनी अग्नीशमनदलाकडून त्वरित ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे. रुग्णालयांनी ४ आठवड्यांच्या आत आगीविषयीचे हे प्रमाणपत्र घेतले नाही, तर राज्य सरकारांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

राज्य सरकारांनी प्रत्येक रुग्णालयात एक अधिकारी नियुक्त करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुजरातच्या राजकोट येथील कोरोना रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून दिले.